औरंगाबाद | राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारची दोन लाखांची शेतकरी कर्जमाफी ही बुजगावणी आहे, अशी टीका केली होती. या टीकेवरुन शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंना सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

बच्चू कडूंना शेतकरी कर्जमाफी बुजगावणी वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं. कर्जमाफीतून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दोन लाखांचा फायदा होणार आहे. ही अंतिम कर्जमाफी नाही, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

READ:  बुलेट ट्रेनसाठी राज्याचा पैसा वापरत नाही, उद्धव ठाकरेंना रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर

हा पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसजसे पैसे येतील त्यानुसार कर्जमाफी केली जाईल. पुढच्या टप्प्यात दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही निर्णय घेतला जाईल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

दरम्यान, मागच्या सरकारने दीड लाखाचा कर्जमाफीच्या निर्णयात किती अटी शर्ती ठेवल्या होत्या? ती कर्जमाफी बच्चू कडूंना चांगली वाटत होती का? आमच्या सरकारने कोणत्याही अटी न ठेवता सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here