मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 मार्चला (शनिवारी) अयोध्येला जाणार आहे. त्यांच्या अयोध्येला जाण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. असे असताना महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे तुम्ही अयोध्येला जाता त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडेही जायला हवं, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. अयोध्यावारीनंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी वारी करावी असं आपण सांगणार असल्याचं ते म्हणाले आहेत. ते विधानसभेत बोलत होते.[quads id=1]

एकीकडे जातीयवाद आणि दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकार मदत करत असले तरी ज्या पद्धतीने आणि ज्या तत्परतेने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचायला हवी ती पोहोचत नाही, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारीची माध्यमात जोरदार चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांची अयोध्या वारी गाजण्याची शक्यता आहे. कारण काही साधूंनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे.

READ:  …तर माझे कान उपटा – अमित शाह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here