चीन (China) सरकारच्या आकडेवारीनुसार कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) आतापर्यंत 563 जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र टेनसेन्ट (Tencent) कंपनीच्या आकडेवारीने तर धक्काच दिला आहे.

बीजिंग, 06 फेब्रुवारी : चीनमधील जीवघेण्या कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus)  एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. एका चीनी कंपनीचा डेटा लीक झाला आणि ही माहिती उघड झाली.

टेनसेन्ट (Tencent)  या कंपनीचा हा डेटा आहे. टेनसेन्ट ही चीनमधील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी कंपनी आहे. टेनसेन्टच्या आकडेवारीनुसार कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 24 हजार पेक्षा जास्त मृत्यू झालेत. तर दुसरीकडे चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार 563 जणांचा मृत्यू झाला आहे.

READ:  भारत की पाकिस्तान को कड़ी चेतावनी, जम्मू-कश्मीर, लद्दाख के साथ गिलगित-बलूचिस्तान भी भारत का हिस्सा, फौरन करें खाली

तैवान न्यूजच्या (Taiwan News) वृत्तानुसार, कित्येक देशांमध्ये असलेली चीनी कंपनी टेनसेन्टचा डेटा चुकीने लीक झाला. या डेटानुसार चीनमध्ये आतापर्यंत 1,54,023 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर 24,589 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सोशल मीडियावर यावरून वादंग निर्माण होताच कंपनीने आपला जुना डेटा हटवला आहे आणि नवीन आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये कोरोनाव्हायरसमुळे एकूण 304 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 14,446जणांना याची लागण झाली आहे.

कोरोनाव्हायरसच्या मृतांबाबत टेनसेन्ट कंपनी आणि चीन सरकारने दिलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे. सोशल मीडियावर हा डेटा व्हायरल होताच चीन कम्युनिस्ट पार्टीने कोरोनाव्हायरसच्या गंभीरतेला सरकार लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या डेटावरून युझर्झमध्येही मतभेद निर्माण झालेत. काही जणांनी सांगितलं की, कोडिंगमध्ये गडबड असल्याने टेनसेन्टचा खरा डेटा ऑनलाइन लीक झाला. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की, कंपनीच्या एखाद्या कर्मचाऱ्याने मुद्दामहून हा डेटा लीक केला आहे. जेणेकरून जगाला कोरोनाव्हायरसच्या खऱ्या परिस्थितीबाबत समजेल.

कोरोना विषाणू इतर देशांमध्येही पसरला आहे. जपानमधील कोरोना विषाणूची लागण 34, थायलंडमध्ये 25, सिंगापूरमध्ये 24, दक्षिण कोरियामध्ये 19, ऑस्ट्रेलियामध्ये 14, जर्मनीमध्ये 12, अमेरिकेत 11, तैवानमध्ये 11, मलेशियामध्ये 10, व्हिएतनाममध्ये 10, फ्रान्समध्ये 6 अशी झाली. अरब अमिरातीमध्ये 5, कॅनडामध्ये4, भारतात 3, फिलिपिन्समधील 3(एका मृत्यूसह), रशियामधील 2, इटलीमधील 2, ब्रिटनमधील 2, बेल्जियममध्ये 2, नेपाळमध्ये 2, श्रीलंकेत 1 आणि फिनलँडमध्ये 1 प्रकरणे आढळून आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here