• क्रिकेट मैदान तयार करणारे पहिलेच देवस्थान 
  • राष्ट्रीय स्पर्धेंसाठी विविध गटांची प्रशिक्षण शिबिरे

 अकोला :प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या  जाणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले . अशा प्रकारचे क्रिकेटचे अत्याधुनिक मैदान तयार करणारे संत गजानन महाराज संस्थान पहिलेच देवस्थान आहे . तसेच देवस्थानच्या वतीने तयार केलेले हे देशातील पहिलेच क्रिकेट मैदान आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी युवा संघांच्या विविध शिबिरांचे आयोजन  करण्यात आलेले आहे .

READ:  ४ दिवसात तुमचं व्हॉट्स अ‌ॅप होऊ शकतं बंद; कंपनीचा मोठा निर्णय

व्हीसीएसाठी सोयीचे

धावपट्टीची स्तुती खेळाडूंनी केली. त्यामुळे अंडर १४, १९, २३ खेळाडूंसाठी सरावाचे हे चांगले केंद्र ठरले. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या सरावासाठीही हा पर्याय ठरताेय. मात्र, अद्याप या मैदानाबाबत विदर्भ क्रिकेट असाेसिएशनने कराराची चर्चा केलेली नाही.

असे मैदान

  • महाविद्यालयामागील परिसरातील एक टेकडी खोदून क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले.
  • धावपट्टी – ५० बाय १०० मीटर
  • बाउंड्री – ७१ यार्ड, दोन्ही बाजू समान
  • अमेरिकन ब्ल्यू ग्रास रोवण्यात आले. पाणी पुरवठा करण्यासाठी अंडरग्राउंड ३७ पॉपअप आहेत.

बीसीसीआयशी करारानंतर रणजीचे सामने रंगणार

येथे जून-जुलैमध्ये नॉर्थ-ईस्ट क्रिकेट संघांची रणजी ट्रॉफी स्पर्धा हाेईल. यासाठी बीसीसीआयची टीम निरीक्षणासाठी येणार आहे. त्यानंतर शेगाव मैदान समिती व बीसीसीआयमध्ये करार होईल. या स्पर्धेत आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम संघ खेळणार अाहेत.

सरकारी नोकरी शोधताय ? मग आमच्या वेबसाईट ला भेट द्या !
Government jobs| Bank Jobs |Police | MPSC.
www.mpscexams.com
जर तुम्ही नोकरीच्या शोधत असाल तर तुमचा शोध येथे संपणार आहे…
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीच्या उपलब्ध संधीची माहिती करून देणे हाच आमचा उधेश आहे.
आम्ही महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशामधील सरकारी नोकरी जाहिराती बद्दल माहिती देतो. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीची नोकरी शोधू शकता.

MPSCExams.com ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

सरावानंतर दिव्यांग वर्ल्ड चॅम्पियन

वर्ल्डकपपूर्वी दिव्यांग टीमच्या खेळाडूंनी येथे सराव केला. त्यांनी भारताला वर्ल्डकप मिळवून दिला. या वेळी विजेत्यांनी शेगावच्या या मैदानाचा खास उल्लेख केला होता.

ऑस्ट्रेलियासारखे आहे आरामदायी आसनव्यवस्था

ऑस्ट्रेलियासारखे ग्रीन टेकडीवरची अासनव्यवस्था येथे तयार करण्यात येणार आहे. याचे छत कौलारू राहील. त्यामुळे अनेक तास क्रिकेटचा आनंद मिळेल.

READ:  LPG Gas Cylinder: दिवाली के मौके पर आम आदमी के लिए खुशखबरी, अब 50 रुपए सस्ते में बुक करें रसोई गैस

विदर्भातील पहिलेच इनडोअर सराव केंद्र

येथे विदर्भातील पहिलेच इंनडोअर सराव सेंटर उभारण्यात येत आहे. सराव सेंटरवर ५ धावपटी(पिच) असतील. ५० बाय १०० मीटरच्या पिचवर विदेशी सिंथेटिक व ग्रीनमॅट असेल. नजीकच्या काळात बॉलिंग मशिंनचीही सुविधा येथे उपलब्ध होईल. सध्या इनडोअर केंद्राचा ढाचा तयार झाला.

 

1 COMMENT

  1. Ya peksha sarva samanya lokansathi no profit no loss basis var susajja hospital nirman kele aste tar te adhik sanyuktik zale aste.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here