मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देेवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये फडणवीसांकडे अर्थमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची चर्चा आहे. केंद्रात संधी मिळणार असेल तर फडणवीसांसाठी ही आंनदाची बातमी आहे.

अरुण जेटली, मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज यांच्यासारख्या नेत्यांच्या निधनाने केंद्रात चांगल्या नेत्यांची पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांना केंद्रात घेऊन ही पोकळी भरुन काढण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीचा इरादा असल्याचं समजत आहे.

READ:  नागपूर : रूग्णालयातून चार संशयित करोनाग्रस्त रूग्णांचं पलायन

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या नात्यात दरी पडली आहे. त्यामुळे केंद्रात फडणवीसांना संधी देऊन सेना-भाजप संबंध सुधारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे फडणवीस केंद्रात जाण्याची शक्यता आहे.

निर्मला सीतारामण यांच्याकडे सध्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी आहे. मात्र, सीतारामण यांच्या कामगिरीवर मोदी समाधानी नसल्याचं कळतंय. तसेच अर्थसंकल्पानंतर मोदींची नाराजी वाढली आहे. त्यामुळे फडणवीसांची अर्थमंत्रिपदी वर्णी लागू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here