मुंबई | विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधिमंडळाबाहेर भाजप नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य नेत्यांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.

शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचारावरुन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारने फसवी कर्जमाफी केली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

READ:  मुंबई की फार्मा कंपनी में गैस लीक होने की सूचना से हड़कंप, अधिकारी जांच में जुटे

कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करु सांगितलं होतं. मात्र, यात अनेक अटी टाकण्यात आल्या. शेतकऱ्यांबाबत सरकारची फसवणुकीची मालिका कायम आहे, याचा आम्ही निषेध करतो, महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. जनतेचा आक्रोश विधानसभेत पोहोचवू, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचं  प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. सरसकट कर्जमाफी, अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत, महिला सुरक्षा या 2 मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here