सायबर पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे रक्कम जमा करण्यात यश

सायबर पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे रक्कम जमा करण्यात यश

READ:  राज्यात सरासरी दरदिवशी १० गुन्ह्य़ांची नोंद

पुणे : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविण्यात आल्याप्रकरणी हाँगकॉँग येथील हेनसेंग बँकेत चोरटय़ाने जमा केलेल्या रकमेपैकी ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये पहिल्या टप्यात बँकेला परत करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

सायबर पोलिसांकडून या प्रकरणात पाठपुरावा करण्यात येत होता. सायबर चोरटय़ांनी हाँगकाँग येथील हेनसेंग बँकेतील एका खात्यात १३ कोटी ९२ लाख रुपये जमा केले होते. सायबर पोलिसांकडून बँकेतील अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधण्यात आला होता  तसेच हाँगकाँग पोलिसांचे साहाय्य या प्रकरणात घेण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास हाँगकाँग पोलीस दलातील अधिकारी लूंग यांच्याकडे देण्यात आला होता.

परराष्ट्र दूतावासाकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानंतर खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्यात आली होती तसेच काँसमॉस बँकेकडून हाँगकाँग येथील न्यायालयात दाद मागण्यात आली होती. हेनसेंग बँकेकडून गोठविण्यात आलेल्या रकमेपैकी पहिल्या टप्यात ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये परत मिळवण्यात यश आले आहे.

सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालिन पोलीस उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेत नेमणुकीस असलेल्या ज्योतिप्रिया सिंग, उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक निरीक्षक सागर पानमंद, अजित कु ऱ्हे, संतोष जाधव यांनी ही कामगिरी केली.कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सव्‍‌र्हर यंत्रणेवर ११ ऑगस्ट २०१८ रोजी सायबर हल्ला करण्यात आला होता. चोरटय़ांनी बँकेतील ९४ कोटी ९२ लाख रुपये लांबविले होते. त्यापैकी काही रक्कम परदेशातील बँक खात्यात वळविण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात सायबर पोलिसांनी मुंबई, मुंब्रा, भिवंडी परिसरातून १४ जणांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here