करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, रस्त्यावर थुंकल्यास आता १००० रुपयांचा दंड होणार आहे. यापूर्वी रस्त्यावर थुंकल्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येत होता. आता त्यात पाचपटीनं वाढ करण्यात आली आहे.

READ:  आ गई कोरोना की एक्सपायरी डेट, इस तारीख के बाद खत्म होगी महामारी

करोना संसर्ग रोखण्यासाठी रल्वे स्थानकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्मचं तिकीटही १० रुपयांवरुन ५० रुपये करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने मंगळवारी घेतला. मुंबईसह, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या विभागीय रेल्वे कार्यालयांना तसे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, करोनाचा फैलाव वाढत असताना मुंबईच्या लोकल आणि बसमधील गर्दी मात्र कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांनी गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल असं म्हटलं आहे. मुंबईकरांनी ऐकलं नाही तर बस आणि लोकल सेवा १० ते १२ दिवसांसाठी जनहितार्थ बंद करावी लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचं टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४७वर[quads id=1]

देशात करोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या १४७वर पोहोचली आहे. तसेच ५७०० पेक्षा अधिक लोकांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, सैन्यामध्ये देखील करोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी एका ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. देशातला करोनाग्रस्ताचा हा तिसरा मृत्यू आहे.

पुण्यात आणखी एक व्यक्ती करोनाग्रस्त[quads id=2]

पुण्यात आणखी एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती फ्रान्स आणि नेदरलँडचा प्रवास करुन आली आहे. त्यामुळे पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १८ वर पोहोचली असून त्यामुळे महाराष्ट्रातील आकडा ४२वर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here