congress
congress

भोपाळ | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्याचं कळतंय. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आलं आहे.

भाजपच्या पाठिंब्यावर ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होणार का? की पुन्हा एकदा शिवराज सिंग चौहान यांचे सरकार येणार आणि ज्योतिरादित्य त्यांना पाठिंबा देणार? या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपत प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे.[quads id=1]

या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी आज सकाळीच दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे हे कमलनाथ यांना मुख्यमंत्री केलं गेल्यापासूनच नाराज आहेत.

READ:  टेलीविजन उद्योग 12.12 प्रतिशत की वृद्धि के साथ 74 हजार करोड़ रुपये का हुआ - ट्राई की रिपोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here