उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळे निर्णय घेत आहेत असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाबळेश्वर येथे तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यावर भाजपा नेते निलेश राणेंनी टीका केली आहे. “१९९५ पासून मी सहा मुख्यमंत्री पाहिले. उद्धव ठाकरेंच्या आधी एकाही मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घेतल्याचं आठवत नाही. यांना येऊन तीन महिनेच झाले आहेत अशात तीन दिवस सुट्टीवर जाण्याचं कारण काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणता पराक्रम केला ? झेपत नसेल तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडा ” अशी टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आहे.

READ:  “…तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावं”

निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना काहीही काम नाही असंही म्हटलं आहे. सगळे निर्णय अजित पवारच घेत आहेत. राज्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री जास्त कार्यक्षमता दाखवून काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांना सुट्टीवरच राहूद्यात कारण आल्यावरही ते गोट्याच खेळतील अशी बोचरी टीकाही निलेश राणे यांनी केली आहे.

याआधी २८ जानेवारीलाही निलेश राणे यांनी शिवभोजन योजनेत घोटाळा झाल्यचा आरोप केला होता. तसंच शिवसेना चाटूगिरी करुनच सत्तेत आली अशीही टीका केली होती. आता पुन्हा एकदा ट्विटरवरुन निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुट्टीवर टीका केली आहे. तुम्ही काय असा पराक्रम केला की तुम्हाला तीन दिवस सुट्टी हवी आहे? असाही प्रश्न निलेश राणे यांनी विचारला आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राहुल गांधींप्रमाणे सुट्टीवर जात आहेत. अशीही टीका निलेश राणेंनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here