राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला.

महाराष्ट्रातील 7 जागांसह देशभरातील एकूण 55 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या 55 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे.

मतमोजणी : या सर्व जागांसाठी 26 मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच 26 मार्च रोजी सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होणार आहे.

महत्वाच्या तारखा : उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 मार्च असेल. 16 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून 18 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख असेल.

READ:  शहिदांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here