digvijay-singh
digvijay-singh

कमलनाथ सरकारची आज बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे.[quads id=2]

मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदारांनी एकगठ्ठा राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. आज या सरकारची बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूत असलेल्या या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह तिथे पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

READ:  Coronavirus: फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलवा, अन्यथा कायदेशीर कारवाई होणार

मध्य प्रदेशातील २१ बंडखोर काँग्रेस आमदार सध्या रामदा हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना भेटण्यासाठी दिग्विजय सिंह या हॉटेलवर पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये जाऊन आमदारांशी चर्चा करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे दिग्विजय सिंह यांनी हॉटेलबाहेरच ठिय्या मांडला. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतले.[quads id=1]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here