पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर नेमकं काय म्हणाले राष्ट्रवादीचे प्रवक्ते?

READ:  “भुंकणारे भुंकत राहतील पण आपण आपलं कीर्तन बंद करु नका”

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडून देण्याचा विचार करत असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर सगळीकडं मोदींच्या या निर्णयाची चर्चा सुरू आहे. यावर मीम्सही व्हायरल होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

‘मी सोशल मीडिया सोडू इच्छितो’ अशा प्रकारचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यानाच धक्का दिला. ‘येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडू इच्छितो. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्युब येथील सगळ्या अकाऊंट्समधून बाहेर पडून ही अकाऊंट्स बंद करु इच्छितो,’ असं मोदी म्हणाले. याबाबत येत्या रविवारी मी माझी भूमिका स्पष्ट करेन असंही मोदींनी म्हटलं होतं.

यावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या निर्णयावर भूमिका मांडली आहे. मलिक यांनी ट्विट करून मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘काल मोदी यांनी रविवारपासून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत. इतर काही नेतेही सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहेत. जर साऱ्या भक्तांनी (मोदी समर्थक) सोशल मीडिया सोडला तर देशात शांतता येईल. मोदीजींचा निर्णय देशाच्या हिताचा असेल. मोदीजींनी निर्णय घ्यावा, आम्ही त्यांचं स्वागत करतो,” असं ट्विट मलिक यांनी केलं आहे. विशेष म्हणजे #ModiQuitsSocialMedia असा हॅशटॅगही वापरला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही सोशल मीडिया सोडणार –

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही मोदींच्या निर्णयाचं समर्थन करत सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट रिट्विट करून अमृता फडणवीस यांनी स्वतःचं म्हणणं मांडलं आहे. ‘कधी कधी लहानसे निर्णय आपलं आयुष्य कायमचं बदलू शकतात. मी माझ्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे,’ असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here