नॅशनल एलिजीबीलिटी एंट्रास टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट (NEET PG 2021) परीक्षेचे ॲडमिट कार्ड 12 एप्रिलला जारी केले जाणार आहे. NEET PG Admit Card 2021

NEET PG Admit Card नवी दिल्ली: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून (NBE) नॅशनल एलिजीबीलिटी एंट्रास टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट (NEET PG 2021) परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड 12 एप्रिलला जारी केले जाणार आहे. नीट पीजी 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड ऑफिशियल वेबसाईट nbe.edu.in वर जारी केले जाईल. विद्यार्थ्यांना अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करायचे असल्यास या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. NEET PG 2021 परीक्षा 18 एप्रिल 2021ला आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दुपारी 1 ते सांयकाळी 5:30 वाजेदरम्यान आयोजिच केली जाईल . ही परीक्षा कॉम्प्यटर बेस्ड पद्धतीनं होणार आहे. (NEET PG Admit Card 2021 to be release soon check how to download)

ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी आयोजित केली जाणार आहे. NEET PG 2021 परीक्षा केंद्रांविषयी माहिती अ‌ॅडमिट कार्डवर दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन परीक्षा केंद्रांवर कसे पोहोचायचे या विषयी माहिती मिळवावी.

NEET PG 2021 Admit Card डाऊनलोड कसे करायचे?

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईट nbe.ed.u.in वर भेट द्यावी
स्टेप 2: वेबसाईट वर दिलेल्या “NEET PG 2021 Admit Card” लिंक वर क्लिक करा
स्टेप 3: युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा
स्टेप 4: तुम्हाला तुमचे अ‌ॅडमिट कार्ड उपलब्ध होईल
स्टेप 5: अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून ठेवा

निकाल कधी जाहीर होणार

NEET PG 2021 परीक्षेचा निकाल 31 मेपर्यंत जारी केला जाणार आहे. हा निकाल nbe.ed.u.in या वेबासाईटवर जाहीर केला जाईल. NEET PG 2021 परीक्षा मेडिकल मध्ये मास्टर्स करण्याची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत MBBS आणि BDS चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मात्र,त्या विद्यार्थ्यांनी इटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. MBBS हा पदवी आणि MD पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

READ:  आईसीसी चेयरमैन पद के मजबूत दावेदार हैं सौरव गांगुली , इनसे मिलेगी कड़ी टक्‍कर!

NEET UG परीक्षा 1 ऑगस्टला

राष्ट्रीय पात्रता किंवा प्रवेश चाचणी किंवा एनईईटी(NEET) 2021 परीक्षा 1 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर एमबीबीएस प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षेसाठी अर्ज लवकरच सुरू होईल. एमबीबीएस / बीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी प्रवेश पोर्टल ntaneet.nic.in वर नोंदणी करावी लागेल.

11 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा

NEET UG परीक्षा या वर्षीपासून 11 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यात इंग्रजा, दिंदी, आसामी, गुजराती, बंगाली, मराठी, ओडिया, कन्नड, तामिळ, तेलगू आणि उर्दू आदि भाषांचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here