बंगळुरू | कर्नाटकमधील एनएम प्रतापने ई-कचऱ्याच्या मदतीने 600 ड्रोन तयार केले आहेत. त्याच्या या उत्कुष्ट कामगिरीमुळे सर्वच त्याचं कौतुक केलं जात आहे. तसेच ड्रोन वैज्ञानिक म्हणून त्याला नवी ओळख मिळालेली आहे.

प्रतापच्या कलागुणांमुळे जगभरातील अनेक देशामधून त्याला ड्रोन बनवण्याचं निमंत्रणही मिळालं आहे. प्रतापला वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्यांदाच ड्रोनमुळे ओळख मिळाली. त्याने ड्रोन चालवण्यापासून ती खोलून रिपेअरिंग करण्यास सुरूवात केली आहे.

READ:  मिशन शक्ति: यूपी में दो दिनों में 14 दुष्कर्मियों को फांसी, 20 को उम्रकैद की सजा

16 वर्षाच्या प्रतापने असे ड्रोन तयार केले जे उडवू शकता येते आणि त्यातून फोटोही काढता येत होतं. विशेष म्हणजे हे ड्रोन त्याने कचऱ्यापासून तयार केलं आहे. मी स्वत: हे बनवायला शिकलो, असं प्रतापने सांगितलं आहे.

प्रतापने हॅकिंगच्या बचावासाठी क्रिप्टोग्राफीचंही काम केलं आहे. कर्नाटकमध्ये पूर आला तेव्हा प्रतापने तयार केलेल्या ड्रोनची तेथील सरकारला मोठी मदत मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here