नांदेड | आम्ही सरकार पाडणार नाही.पण हे तीन पक्षच एकमेकांच्या पायात पाय घालत आहेत. त्यामुळे हे सरकार कधी कोसळेल याचा नेम नाही, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

भाजप सरकारने केलेल्या कामांना स्थगिती देण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. हे महाविकास आघाडी नव्हे तर स्थगिती सरकार आहे, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडले.

अमर, अकबर, अँथोनी या तीनजणांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनविले. भाजपशी विश्वासघात करून शिवसेनेने सरकारमध्ये स्थान मिळविले आहे, अशी टीका त्यांनी केली.

आज मुख्यमंत्र्यांची अवस्था रबराच्या बाहुलीसारखी झाली आहे. मित्र पक्षाच्या इशाऱ्यावर या रबरी बाहुलीचा कारभार सुरू आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

READ:  थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here