[quads id=1] २१ लाख ८२ हजार जणांचा समावेश

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची  दुसरी यादी राज्य सरकारने शनिवारी प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

READ:  नागपूर विमानतळावर देशांतर्गत प्रवाशांची तपासणीच नाही

आतापर्यंत एक लाख ४२ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिली प्रायोगिक तत्त्वावरील यादी २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्ज खाती जाहीर करण्यात आली होती. या दुसऱ्या यादीनंतर राज्यात आतापर्यंत २१ लाख ८२ हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात १५ जिल्ह्य़ांत पुर्णाशाने तर ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने १३ जिल्ह्य़ात अंशत: याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

कर्जमुक्ती योजनेतील अपेक्षित अशा ३६ लाख ४५ हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर ३४ लाख ९८ हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकऱ्यांना लाख मोलाचा दिलासा
शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती
अर्ज करण्याची आवश्यकता नाही
२ लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ
थकबाकी भरण्याची अट नाहीशेतकऱ्यांना लाख मोलाचा दिलासा
शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती
२ लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ
अर्ज करण्याची आवश्यकता नाही
थकबाकी भरण्याची अट नाही

[quads id=2 ]शेतकऱ्यांना मिळणारा लाभ!!!

३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!

कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !

सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती

 1. आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
 2. मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
 3. या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
 4. शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
 5. पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
 6. कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल.
 7. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.

[quads id=1]

यांना लाभ मिळणार नाही

 1. आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार

 2. केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)

 3. महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)

 4. सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी

 5. २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती

 6. शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती

 

पुढील लिंक वर तुम्हाला कर्जमाफी ची यादी ऑनलाइन पाहता येईल Link : http://bit.ly/39fjr09 [quads id=2]

कर्ज माफी ची संपूर्ण माहिती येथे मिळेल – [quads id=1] महात्मा फुले कर्ज माफी योजना

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here