किशोरींच्या अंतिम सामन्यात उपनगरने परभणीचा ५५-२७ असा फडशा पाडला.

अहमदनगर : अहमदनगर येथील रेसिडेन्शियल हायस्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या ३१व्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ठाणे आणि मुंबई उपनगर या संघांनी अनुक्रमे किशोर आणि किशोरी गटाच्या विजेतेपदावर नाव कोरले.

किशोरींच्या अंतिम सामन्यात उपनगरने परभणीचा ५५-२७ असा फडशा पाडला. हरजितकौर सिंगच्या भन्नाट अष्टपैलू खेळाला याशिका पुजारी, समृद्धी मोहिते यांची उत्तम साथ लाभल्याने उपनगरने विजेतेपद कायम राखण्यात यश मिळवले. परभणीच्या निकिता लंगोरे, गौरी दोहे यांनी चांगला खेळ केला.

किशोर गटाच्या अंतिम लढतीत ठाण्याने पुण्याचा ४२-१९ असा धुव्वा उडवला. सलग दोन वर्षे उपविजेतेपदावर समाधान मानल्यानंतर ठाण्याने प्रथमच विजेतेपद पटकावले. प्रिन्सकुमार तिवारी, कौस्तुभ शिंदे यांनी ठाण्याच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पुण्याकडून राहुल वाघमारेने एकाकी झुंज दिली.

 

READ:  टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा 'सगळ्यात मोठा' विक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here