मुंबई | गेल्या 5 वर्षात अव्वल स्थानी असणरी राज्ये खूप मागे गेलेत. त्यातच केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराचे 15 हजार कोटी रुपये थकवले आहेत. केंद्र सरकरामुळेच राज्यात अर्थिक अडचणी निर्माण झाल्यात. , असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
अर्थसंकल्प तयार करणंही अवघड झालं आहे. विविध योजनांवर त्याचा परिणाम होणार असल्याचा इशाराही सुप्रिया सुळेंनी दिला आहे. विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलंय. अर्थमंत्री अजित पवार यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या आहेत. केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा कराचे 15 हजार कोटी रुपयांचं घेणं आहे. पैसे नसल्याने कुपोषण, शिक्षण आणि विविध कामांसाठी पैसे येणार कुठून? अर्थसंकल्प तयार कसा करायचा?, असा सवाल अजित पवारांपुढे असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार अल्पमुदतीचं ठरुन लवकरच मध्यावती निवडणुका होतील असा दावा केला असला तरी त्यात काहीही तथ्य नाही. हे सरकार आणखी 15 वर्षे टिकेल, असा विश्वास यावेळी सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला आहे.