उमेश खोकले असं मृतकाचं नाव आहे. ते न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते.

वर्धा, : वर्ध्यामध्ये न्यायालयाच्या इमारतीमध्ये मृतदेह आढळ्याने एकच खळबळ उडाली आहे. वर्ध्यातील न्यायालयाच्या नवीन ईमरतीच्या (न्याय मंदिर) शौचालयात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना शौचालयामध्ये मृतदेह आढळला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. वर्धा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश खोकले असं मृतकाचं नाव आहे. ते न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. उमेश यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आज सकाळी दुर्गंधी सुटल्यानं ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.

READ:  आज से बदल गए ट्रैफिक के नियम, मिली मोबाइल देखने की छूट, अब इन बातों के लिए नहीं कटेगा चालान

दरम्यान, न्यायालयाच्या इमारतीमध्ये अशा प्रकार घडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उमेश यांच्या आत्महत्येमागे अनेक तर्क लावले जात आहेत. तर ही नेमकी आत्महत्या की हत्या याचाही पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून उमेश यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

उमेश यांनी आत्महत्या केली तर त्यांचं काय कारण असाव यासंदर्भात पोलीस तपास करत आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर तपासाला वेगळं वाळण लागेल असंही पोलिसांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस न्यायालयातील इतर कर्मचारी आणि उमेश यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.[quads id=1]

या घटनेची माहिती उमेश यांच्या कुटुंबियांना देण्यात आली असून संपूर्ण खोकले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात उमेश यांना काही कौटूंबिक तणाव होता का याचाही पोलीस तपास करत आहेत. त्यासाठी कुटुंबियांचीदेखील चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.[quads id=2]

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here