मुंबई | सध्या चॅटिंगसाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं व्हाट्स अ‌ॅप ४ दिवसात मोबाईलमधून डिलीट होणार आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळेच याचा सर्रासपणे वापर करतात. १ फेब्रुवारीपासून काही मोबाईमधून व्हाट्स अ‌ॅप बंद करणार असल्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

व्हाट्स अ‌ॅप वापणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मोबाईलमधून व्हाट्स अ‌ॅप हद्दपार केले जाणार असल्याचं कारण कंपनीकडून देण्यात आलं आहे. अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर करडी नजर ठेवली असल्याचीही माहिती मिळतेय. एन्ड्रॉइड, आयइओएस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणाऱ्यांना व्हॉट्स अ‌ॅप वापरता येणार नसल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.

जुन्या व्हर्जनचे व्हाट्स अ‌ॅप अपडेट करण्याचे आवाहन कंपनीने ग्राहकांना केले आहे. २जी फोन वापरणाऱ्यांना आता व्हाट्स अ‌ॅपचा वापर करता येणार नसल्याचं कंपनीने सांगितलं आहे. विंडोज ८.१ नंतरच्या सर्व वर्जनसाठी व्हाट्स अ‌ॅप वापरता येणार आहे.

दरम्यान, व्हाट्स अ‌ॅपवरुन व्हाईस कॉलचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवं फिचर आणलं आहे. व्हाट्स अ‌ॅप कॉलिंग सुरु असताना कॉल वेटिंगला येण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

READ:  मध्य प्रदेशात राजकीय धुळवड रंगात; कमलनाथ सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here