मुंबई | आम्हाला आता कोणत्याही पक्षासोबत सरकार स्थापन करण्यात रस नाही, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.[quads id=1]

आमचा निर्णय केंद्रीय नेतृत्व करतो. वर्षानुवर्षे आम्ही एकत्र काम केलं आहे. काही गोष्टींचा राग मनात असणं बरोबर आहे. पण आता सरकार स्थापन करणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं

READ:  आज से शुरू हुईं 392 स्‍पेशल ट्रेनें, सारे नियमों से लेकर किराये तक जानें सबकुछ

कोणीही बोलावलं किंवा विचारणा केली तरी आम्ही कोणासोबतही सरकार स्थापन करणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान, सध्या चौकशी लावणं, टोमणे मारणं असे प्रकार केले जात आहे. हे प्रकार योग्य नाहीत. यापूर्वी युती तुटली किंवा अशा काही प्रकारांमुळे मनात राग असणं स्वाभाविक आहे. पण यापूर्वी अनेकदा आम्ही एकत्र काम केलं आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here