सांगली | आम्ही झोपेत असलो तरी सावधपणे काम केलंय. यामुळे आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मात्र चौकशीचे अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर यावेत ही अपेक्षा आहे, असं भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

READ:  औरंगाबाद का नाम बदलने पर शिवसेना-कांग्रेस में तकरार, थोराट बोले- गठबंधन स्थिर है

सरकारने मागिल कामांच्या जेवढ्या चौकश्या लावायच्या तेवढ्या चौकशा लावाव्यात. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सरकारने जानादेशाचा आनादर करणं आणि जुन्या सरकारचे लोकोपयोगी निर्णय रद्द हे दोनच कार्यक्रम हाती घेतले असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, असं सांगत चंद्रकांत पाटील /यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आता आत्मनिर्भर होत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास त्यांनी तीन महिन्यांचा काळ घालावयाला नको होता, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here